गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (16:08 IST)

बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांची सरकारवर टीका

हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा सवाल करत निलेश राणे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. बीड अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. भाजपने या घटनेवरुन राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बीड येथे एका तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करताना निलेश राणे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत,” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.