Daily Horoscope
✕

महाराष्ट्र भाजप नेते म्हणाले अशा मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहिण योजनेतून वगळा

Updated: बुधवार, 11 डिसेंबर 2024 (11:49 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार नितीश राणे म्हणाले की, हिंदू समाजावरील अत्याचाराच्या विरोधात हिंदू यात्रा सुरू केली आहे. सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने बांगलादेशातील आपल्या हिंदू माता, भगिनी आणि बांधवांसाठी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा बांगलादेशी हिंदूंसाठी आहे. महाराष्ट्रातील हिंदू समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही पाहत आहोत. आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जास्त काळ होऊ देणार नाहीत. तसेच हिंदू मोर्चाला संबोधित करताना नितीश राणे म्हणाले की, बांगलादेशात आपल्या हिंदूंवर अत्याचार होत आहे. आमच्या धर्मगुरूंची हत्या केली जात आहे. इस्कॉनच्या पुजाऱ्यांना अटक केली जात आहे. त्याची केस लढणाऱ्या वकिलांची हत्या करण्यात आली. हिंदू माता-भगिनींवर सामूहिक बलात्काराच्या घटना रोज समोर येत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
 
नितीश राणे पुढे म्हणाले की, मुस्लिम कुटुंबांना मोदी नको आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर ठेवले पाहिजे. प्रत्येक सरकारी योजनेचे लाभार्थी बहुसंख्य मुस्लिम कुटुंबे आहे. अशा परिस्थितीत हिंदूंना काय फायदा होणार? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन की या योजनेतून आदिवासी समाज वगळता 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या सर्व कुटुंबांना वगळावे असे देखील नितीश राणे म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल शासकीय सेवा प्लॅटफॉर्म सुरू होणार

महाराष्ट्रात २६ जानेवारी रोजी डिजिटल शासकीय सेवा प्लॅटफॉर्म सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके दुष्काळग्रस्त घोषित

रुग्णांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णय; आता रुग्णांना उपचारापूर्वी खर्चाची माहिती मिळू शकेल

वाण निवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शक: गहू लागवड

पुढील लेख
Show comments