रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2024 (10:43 IST)

बीड : पोलिसात नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करून परतत असतांना अपघातात 4 जणांचा मृत्यू

Beed News: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात चार मित्रांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहे. हे सर्व मित्र त्यांच्या मित्रांची पोलिसांत नोकरी लागली म्हणून आनंदोत्सव साजरा करून परतत होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत चार मित्रांचा मृत्यू झाला, तर दोन मित्र जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. अंबाजोगाईजवळील वाघळा येथे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  कार आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला. एका पोलीस अधिकारींनी सांगितले की,  मांजरसुंभा येथून परतत असताना छत्रपती संभाजीनगर-लातूर रोडवर त्यांची कार ट्रकला धडकली. या अपघातात बालाजी शंकर माने, दीपक दिलीप सावरे आणि फारुख बाबू मिया शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऋतिक हनुमंत गायकवाड यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अजीम पश्मिया शेख आणि मुबारक सत्तार शेख हे गंभीर जखमी झाले, अशी माहिती त्यांनी दिली. दोन्ही जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.  

Edited By- Dhanashri Naik