सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:22 IST)

खासदार उदयनराजे भोसले यांचे कोरोनाबाबत अजब वक्तव्य

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून सावधनता बाळगण्याचा इशारा दिला आहे. असं असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. 'कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार आहे' कोणी जाणार जरी म्हटलं तरी कोरोना जाणार नसल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
 
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं. यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट देवून मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केलं आहे.