शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (16:01 IST)

भाजपाकडून बाळासाहेबांचाच एक व्हिडीओ शेअर करून शिवसेनेला प्रत्युत्तर

शिवसेना भवनासमोर झालेल्या वादानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला इशारा दिली होता. दरम्यान, आता भाजपानेही बाळासाहेबांचाच एक व्हिडीओ शेअर करून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. 
 
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. भाजयुमोच्या फटकार मोर्चानंतर काही जणांनी शिवसेनाप्रमुखांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांच्यासाठी सोनिया मातोश्रींचा आणि त्यांच्यासमोर वाकणाऱ्यांचा विशेष उल्लेख असलेला हा खास व्हिडीओ, असा खोचक टोला लगावत अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.  
 
दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला होता. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.