भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’

Chitra Wagh
Last Modified मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या
विरोधात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या मुद्यावरुन भाजपच्या

अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही ठाकरे सरकारवरजोरदार निशाणा साधला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येई की नाही माहित नाही, पण राज्यात महिला अत्याचाराची लाट येत असल्याचे म्हणत चित्रा वाघ
यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

विठू माऊली सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी मावळ आयोजित लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी चित्रा वाघ बोलत होत्या.राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडीचं हे सरकार
लोकधार्जिणे नसून, त्यांच्या आमदार, खासदार आणि बगल बच्च्यांसाठी हे सरकार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे माहिती नाही, पण राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे. अत्याचाऱ्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही. राज्यात कोणालाच धाक नाही. संजय राठोड
सारख्या बलात्काऱ्याला
आणि सरकारमधील भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना वाचवण्याचं पाप हे सरकार करत आहे, असा घणाघात त्यांनी केला.
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवत आहात.मग ज्या मावळात
आपण बसलोय त्याच मावळमधील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यावेळी तीन शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केले.त्यावेळेस महाराष्ट्र बंद का नाही केला? असा सवाल करत आमच्या संवेदना त्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्या चांदीचे नवे दर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात घसरण झाली. आज सलग ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला
आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, ...

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...