1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 6 मार्च 2022 (11:59 IST)

भीषण अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

Board officer killed
गेवराई तालुक्यात राक्षस भुवन मार्गावर झालेल्या गाडीच्या भीषण अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. बीड मंडळ अधिकारी नितीन जाधव(39) असे या मयत अधिकाऱ्याचे नाव आहे. हे अधिकारी गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळूच्या तस्करी विरोधात होणाऱ्या कारवाई साठी पथकासह जात असताना पथकातील एका गाडीचा वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन झाडाला जाऊन धडकली आणि या अपघातात बीडचे मंडळ अधिकारी नितीन जाधव हे जागीच ठार झाले तर बीडचे प्रभारी तहसीलदार डोके हे गंभीर जखमी झाले. 
 
मयत नितीन जाधव हे बीड जिल्ह्यात महसूल मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होते. अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापित केले आहे. अधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षस भुवन सावळेश्वर, म्हाळसपिंपळ्गाव येथे अवैध वाळू वाहतुकी विरोधात कारवाईसाठी गेले असता आज पहाटे 4 च्या सुमारास मंडळ अधिकारी नितीन जाधव आणि तहसीलदार डोके यांचा गाडीचा अपघात झाला. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात नितीन हे जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.