सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (17:28 IST)

बारावीच्या पेपर मध्ये चूक, चुकीच्या प्रश्नाचा विद्यार्थ्यांना मिळणार 1 गुण

काल पासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.तब्बल 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा देत आहे. कोरोना साथीच्या आजारानंतर प्रथमच बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहे. बारावीच्या इंग्रेजीच्या पेपर मध्ये 1 गुणांचा चुकीचा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 
 
चुकीच्या प्रश्नाबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना बोर्डाकडून 1 गुण अधिक दिला जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. काल पासून सुरु झालेली बारावीची परीक्षा 7 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. 
 
यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी साठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. 
 गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 70 ते 100 गुणांचा पेपर लिहिण्यासाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटाची वेळ वाढवून देण्यात आली आहे.