शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (17:33 IST)

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण व नितेश राणेंना 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

disha saliyan
दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात दिंडोशी न्यायालयाकडून या पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे.
 
10 मार्चपर्यंत दोघांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
 
याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस संबंधित ठाण्याच्या पोलिसांनी पाठवली आहे. मात्र, दिंडोशी न्यायालयाकडून त्यांना अंतरिम दिलासा मिळाला. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता.
 
त्यानंतर दिशा सालियानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.