सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (17:28 IST)

भुसावळच्या नगरसेवक खून प्रकरण : संशयितास नाशिकरोडमध्ये अटक

jail
भुसावळ नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक व जळगाव रिपाई (आठवले गट)जिल्हाध्यक्ष रविंद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या दादा व त्याच्या घरातील एकूण चार जणांचा रिवॉल्वरने फायर करून  खून करून व इतर तीन जणांना जबर जखमी करून फरार असलेल्या गुन्ह्यातील प्रमुख संशयितास नाशिक येथील  नाशिकरोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
 
याबाबत अधिक माहिती अशी की,तीन वर्षांपूर्वी भुसावळ नगर परिषद चे भाजपा नगरसेवक व रिपाई (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रविंद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या दादा राहणार, भुसावळ जिल्हा जळगांव यांच्या घरात घुसून त्याना व त्याच्या परिवारावर रिव्हलवर मधून बेशुट गोळीबार केला, त्यात नगरसेवक रविंद्र बाबुराव खरात व त्यांच्या घरातील चार असे एकूण पाच जणांना ठार केले होते. हल्ला करून संशयित पळून जात असताना मोठा गदारोळ झाल्याने संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नागरिकांवर त्यांनी हल्ला चढवल्याने त्यात जवळपास तीन जण गंभीर जखमी झाले होते. हे हत्याकांड संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाजला होता. विधानसभेतही त्याचे पडसात उमटले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास मुंबई येथील सीआयडी विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तेव्हापासून यातील प्रमुख अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा फरार होता. त्यामुळे पोलिसांपुढे या संशयित गुन्हेगारास पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.