1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (11:43 IST)

पुण्यातील मटका किंग खून प्रकरणात BJP कनेक्शन; बड्या पदाधिकाऱ्याला अटक

काही दिवसांपूर्वी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे पुण्यातील  मटका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. येथील एका इमारतीच्या टेरेसवर अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केली होती पण या हत्येचा मास्टरमाइंड भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरवळ पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
अमोल बंडोपंत हुलावळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 36 वर्षीय आरोपी हुलावळे हा पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील रहिवासी आहे. हुलावळे हा भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे. तसेच अखिल भारतीय मराठा युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहे.