पुण्यात नद्यांच्या संवर्धनासाठीच्या प्रकल्पाचे उदघाटन पंत प्रधान नरेंद्र मोदी करणार
महामेट्रोच्या उदघाटनासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दरम्यान पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पाचे उदघाटन पंत प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प जायका कंपनीने मान्य केला असून त्या संबंधित स्थायी समितीत निविदा मंजूर करून भूमिपूजन करण्याचे योजिले आहे. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी हे प्रकल्प कार्यरत असणार अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात नदीकाठावर एकूण 11 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून शहरातील सांडपाणी शुद्धकरून नदीत सोडले जातील. प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणच्या शुद्धतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. 2015 मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती.
या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून त्याचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. या पकल्पावर सुमारे 1500 कोटी रुपये खर्च केले आहेत.