रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (21:38 IST)

अशी आहे आदित्य ठाकरे यांची मोजक्या शब्दातली प्रतिक्रीया

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या या दोन्ही नेत्याकडून शिवसेनेच्या नेत्यांवर दररोज आरोप होत आहेत. हे आरोप तर थेट मातोश्री पर्यंत येऊन पोहोचले आहेत. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “मला वाटत की त्याला किती महत्व द्यायचं, हे आपण ठरवायचे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
 
पुण्यात येरवडा येथील डॉ.चिमा उद्यान मध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाची पाहणी आणि उदघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना विचारले.