1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:43 IST)

मुलाच्या अभ्यासावरून आईची आत्महत्या

suicide
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक भयानक घटना घडली आहे. मुलांचा अभ्यास घेताना पत्नी मुलगावर रागावली म्हणून पतीने पत्नीला रागावून बोलला आणि त्यामुळे निराश झालेल्या पत्नीने बेडरुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
 
का झाला वाद?
रोहिणी राकेश थोरात (वय 25) असं मयत विवाहितेचं नाव आहे. तर राकेश थोरात असं पतीचं नाव आहे. या घटनेबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकची माहिती दिली. रोहिणी थोरात यांचे पती राकेश थोरात कामावरुन घरी आले, त्यावेळी रोहिणी या मुलाचा अभ्यास घेत होत्या.
 
मुलगा नीट अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी यांनी त्याला हाताने मारहाण केली. हे बघितल्यानंतर राकेश थोरात यांनी मध्ये हस्तक्षेप करून 'अभ्यासासाठी मुलाला मारू नको, असं रोहिणी यांना रागाच्या स्वरात म्हणाले. त्यानंतर त्यांनी मुलाला जवळ घेतलं. 
त्यावरून रोहिणी नाराज झाल्या. या घटनेनंतर रोहिणी यांनी बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास भिगवण पोलिसांकडून केला जात आहे.