मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (18:42 IST)

पुणे- मुंबई महामार्गावर कंटेनरने पेट घेतला

Container caught fire on Pune-Mumbai highway पुणे- मुंबई महामार्गावर कंटेनरने पेट घेतला Marathi Pune News In Webdunia Marathi
मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या कंटेनरला खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपं गावाजवळ आग लागली. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
एक मोठा वस्तू वाहतूक करणारा कंटेनर मुंबईहुन पुण्याला जात होता. या कंटेनरला भर रस्त्यात आग लागली. आग लागल्याने द्रुतगतीवरील वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस, आयआरबी कर्मचारी आणि देवदूत यंत्रणा घटनास्थळी रवाना झाले आणि पोलिसांनी कंटेनर रस्त्याच्या कडेला केले. आणि वाहतूक सुरळीत केली.  पण त्यातील सामानाने पेट घेऊन आगीने रौद्र रूप घेतले. आग विझवल्यावर कंटेनर खालापूर टोल नाक्याजवळ आणले. खालापूर जवळ आणल्यावर कंटेनर पुन्हा पेटले. मात्र सुदैवाने कंटेनर चालकाला काहीही झाले नाही. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. खालापूर पोलीस तपास करत आहे.