बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (21:41 IST)

उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असणारा, देशासमोर आपली मते निर्भीडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांना प्रेरणा देणारा असा देशाभिमानी उद्योजक आपल्या मधून एकाएकी निघून जाण्याने राज्याच्या उद्योग विश्वाचे  नुकसान झळाळे आहे. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना मोकळ्या करून श्रद्धांजली वाहिली आहे. 

राहुल बजाज यांचे पार्थिव रविवारी सकाळी 10:30 वाजता आकुर्डीतील बजाज कंपनीत आणले जाणार आहे. कामगारांना दुपारी तीन वाजे पर्यंत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पुण्यात नेले जाणार असून सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. 
 
राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आली असून या क्षेत्रातील इतर कंपन्यासमोर भारताचे आव्हान उभारले.त्यांनी आपल्या उद्योगाचा विकास व्हावा असा संकुचित विचार केला नाही तर देशाच्या सर्व उद्योगाशी निगडित समस्या आणि त्यांच्यावर येणाऱ्या अडचणींवर स्पष्ट आणि निग्रही भूमिका घेतली. त्यांनी समाजासाठी देखील अनेक कार्य केले. 

राहुल बजाज हे उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या.