1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (16:36 IST)

उद्योगपती राहुल बजाज यांचे कर्करोगाने निधन

Businessman Rahul Bajaj dies of cancer उद्योगपती राहुल बजाज यांचे कर्करोगाने निधनMarathi Pune News In Webdunia Marathi
बजाज मोटर्सचे संस्थापक राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात कर्करोगाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज 50 वर्षे त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे अध्यक्षही होते. 2001 मध्ये त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 
 
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील कमलनयन बजाज हे देखील मोठे उद्योगपती होते 
राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. राहुलचे शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज मधून झाले. त्यांनी मुंबईच्या विधी विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली आहे.
 
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेतली. कंपनीचे नेतृत्व करताना त्यांनी बजाज चेतक नावाची स्कूटर बनवली. राहुल बजाज 1972 पासून कंपनीचे गैर-कार्यकारी अध्यक्षपद पाहत होते.
 
गेल्या वर्षी पद सोडले,
83 वर्षीय राहुल बजाज यांनी वयाचा हवाला देत पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक राहुल बजाज हे 1972 पासून बजाज ऑटो आणि गेल्या पाच दशकांपासून बजाज ग्रुप ऑफ कंपनी शी संबंधित आहेत.