1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (15:22 IST)

पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये पारदर्शक पद्धतीने काम व्हावीत

‘पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये पारदर्शक पद्धतीने काम व्हावीत अशापद्धतीने कटाक्षाने प्रयत्न केला आहे. कोविड सेंटरच्या कामाशी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा संबंध नाही. यामध्ये सौरव रावसह काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना जे काही करायचं आहे, ते अतिशय पारदर्शक पद्धतीने, चुकीच घटना काम नये, असे सांगण्यात आले होते,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
 
तसेच पुढे अजित पवार म्हणाले की, ‘कोविड सेंटरबाबत आरोप होत असल्यामुळे आयुक्तांना याबाबत नोट काढण्यास सांगितली होती.  बैठकीच्या सुरुवातीला यावर चर्चा करण्यात आली. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही.’ असे सांगितले.