शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (19:18 IST)

सीएच्या परीक्षेत तिसऱ्यांदा नापास झाल्याने तरुणीची आत्महत्या

दोन वेळा सीएच्या परीक्षेत नापास झाल्याने तिने पुन्हा तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली मात्र दुर्देवाने त्यात ती नापास झाली आणि तिने टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडच्या केशवनगर येथे घडली आहे. पल्लवी संजय जाधव(24) असे या मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी सीएचा अभ्यास करत होती. तिने सीएची परीक्षा दोन वेळा देऊन देखील तिला अपयश मिळाले. तिने हिम्मत राखून पुन्हा तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली. सीएचा निकाल आल्यावर तिला तिसऱ्यांदा पुन्हा अपयश हाती आले. ती कोलमडून गेली आणि घरात कोणाशीही बोलली नाही. आज सकाळी तिने  चिंचवड मधील केशवनगर या ठिकाणी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड पोलीस तपास करत आहे.