मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (10:14 IST)

बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालकांनीआंदोलन पुकारले

पुण्यात बाईक टॅक्सी विरोधात आज रिक्षा संघटनांनी जोरदार आंदोलन पुकारले. यावेळी मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.
 
कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रावर बसला. व्यवसायांवरही त्याचा परिणाम दिसून येत असून टॅक्सी-बाईक सुरू असल्याने रिक्षाचालक धंद्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 4 जानेवारी रोजी टॅक्सी-बाईक आठ दिवसांत बंद करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, एक महिना जास्त उलटूनही काही कार्यवाही झालेली नाही. याचा निषेध व्यक्त करत हजारो रिक्षा चालकांनी बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन पुकारले. याआधीही काही दिवसापुर्वी रिक्षा चालक आक्रमक झाल्याचे दिसले होते.