गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (18:04 IST)

75 वर्षीय आजोबांनी केलेला पराक्रम तरुणांनाही लाजवणारा, व्हिडीओ व्हायरल

तब्बल 7 वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद होती. आता बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने बैलगाडा शर्यत प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खरं तर बैलगाडा शर्यत हे बळीराजाच्या जीव की प्राण असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवर शेतकरी बांधवांचे प्रेम असते. सात वर्षे बैलगाडा शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमी नाराज होते. मात्र यंदा बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने पुण्याच्या खेड तालुक्याततील चिंचोशी गावातील 75 वर्षीय मधुकर पाचपुते यांना खूप आनंद झाला. त्यांनी जल्लोषात येऊन जे काही केले ते सर्वाना थक्क करणारे आहे. 
 
त्यांनी केलेल्या पराक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  सध्या त्यांनी केलेल्या या पराक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. अखेर त्यांनी असे काय केले जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे. 
 
माणसाची इच्छाशक्ती दाणगी असेल तर तो काहीही करू शकतो. त्यासाठी वय देखील गौण असत. हे मधुकर पाचपुते यांनी केले आहे. त्यांना बैलगाडा शर्यत सुरु होण्याचा एवढा आनंद झाला की चक्क त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जेव्हा या वयात माणूस अंथरुणावर खिळलेला असतो किंवा कोणाच्या आधाराशिवाय चालत नाही. त्यांनी या वयात चक्क मावळ तालुक्यात नानोली येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत जल्लोषात घोड्यावर बसून आपल्या वयाला न बघता घोडेस्वारी केली आहे. 
 
पाचपुते आजोबांचा घोडेस्वारीचा हा व्हिडीओ सोशल व्हिडिओवर व्हायरल  प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांचा दाणगी उत्साह , त्यांना झालेला आनंद, त्यांच्यातील ऊर्जा दिसून येत आहे. त्यांचा हा पराक्रम तरुणांना लाजवणारा आहे. पण त्यांचा हा उत्साह खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या उत्साह आणि हिम्मतीचे खरोखर कौतुक करण्यासारखे आहे. 
 
पाचपुते आजोबा म्हणतात की ,त्यांना लहानपणापासून बैलगाडा शर्यतीची आवड आहे. लहान पणापासून आमच्या घराचे वातावरण घोडे आणि बैलाचे शर्यतीचे असल्याने त्यांना घोडेस्वारी करायला भीती वाटली नाही.  
बैलगाडा घाटात त्यांना घोडेस्वारी करताना बघून जमलेल्या दर्शकांनी चक्क त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला.