1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (14:21 IST)

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपाताचा गुन्हा दाखल

Shiv Sena leader Raghunath Kuchik booked in rape case in pune
पुणे शहर पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 24 वर्षीय तरुणीने कुचिकविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुचिकने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केला, असा आरोप महिलेने केला आहे.
 
तक्रारीनुसार, ही घटना 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडली. पुणे, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये घडले आहे. रघुनाथ कुचिक याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि मुलगी गरोदर राहिली. हे ऐकून रघुनाथ कुचिक याने बळजबरीने तिचा गर्भपात केला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.