1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (15:48 IST)

बांधकाम व्यवसायिक भारत देसडला यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यवसायिक भारत देसडला यांच्याविरोधात हा एका महिलेने काही दिवसांपूर्वी तक्रार दिली होती.  
 
लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा पीडितेने आरोप करताना तक्रार दाखल केली होती. दरम्यान, घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष भारत देसडला होते. या गुन्ह्यानंतर साहित्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे देसडला भागीदार आणि संचालकाविरोधात आता पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
 
49 वर्षीय महिलेने भारत देसडला यांच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार महिला या देसडला यांच्याकडे नोकरी करत होत्या. त्यावेळी त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. हा प्रकार डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कोथरुड पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी डेक्कन पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर डेक्कन पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला आहे.