तिरुअनंतपुरममधील हॉटेलमध्ये आढळले पुण्यातील भाऊ आणि बहिणीचे मृतदेह
Maharashtra News: रविवारी सकाळी तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलच्या खोलीत महाराष्ट्रातील एका भाऊ आणि बहिणीचे मृतदेह आढळले. पोलिसांनी सांगितले की, मृत भाऊ आणि बहीण मूळचे पुण्याचे होते आणि दोघेही गेल्या शुक्रवारी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत भाऊ आणि बहीण मूळचे पुण्याचे होते आणि दोघेही गेल्या शुक्रवारी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोली बराच वेळ बंद आढळली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी सांगितले की, पुरूषाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर महिलेचा मृतदेह बेडवर पडलेला होता. हॉटेलच्या खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये दोघांचेही घर किंवा नोकरी नसल्याचे सूचित केले आहे.घटनास्थळी पोहोचलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “एक सुसाईड नोट सापडली आहे आणि पुढील तपासाच्या आधारेच आम्ही सविस्तर माहिती देऊ शकतो. ते दोघेही तिरुअनंतपुरमला का आले होते आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास केला जात आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की तो अनाथ आहे आणि मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देऊ नये. पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की, भावाने आधी बहिणीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. पोस्टमोर्टमननंतर मृत्यूचे कारण कळेल असे पोलिसांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik