बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (10:54 IST)

मुंबई हावडा मेल रेल्वेमध्ये बॉम्बची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

आज पहाटे मुंबई-हावडा मेल ही रेल्वे जळगाव येथे थांबवून शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच तपासाअंती सुरक्षा कर्मचाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-हावडा मेल रेल्वेला बॉम्बची धमकी मिळाली आहे. त्यानंतर संपूर्ण रेल्वेमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बॉम्बची धमकी देण्यात आली होती. तर टायमरद्वारे स्फोटाची धमकी देण्यात आली होती. तसेच, धमकी मिळताच तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि रेल्वेची शोध मोहीम हाती घेण्यात आली.
 
रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात असे सांगितले आहे की, आज पहाटे कंट्रोल रूमला ट्रेन क्रमांक 12809 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. तसेच तातडीने जळगाव स्थानकावर गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यानंतर ट्रेन सुरळीतपणे इच्छित स्थळी रवाना करण्यात आली.
 
तसेच धमकीच्या पोस्टनंतर आज पहाटे जळगावात मुंबई हावडा-मेल थांबवून शोध घेण्यात आली. सुमारे दोन तासांच्या तपासानंतरही सुरक्षा कर्मचाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. अशा परिस्थितीत बॉम्ब सापडण्याची धमकी निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. 

Edited By- Dhanashri Naik