बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (09:29 IST)

हल्लेखोरांनी सोबत पेपर स्प्रे आणला होता, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

baba siddique
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये शनिवारी रात्री अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाबद्दल पोलिसांनी एक खुलासा केला . 
 
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर शिव कुमार याने फायरिंग केली होती. तो अजून फरार आहे. तसेच आरोपींनी एनसीपी नेता यांच्या डोळ्यामध्ये पेपर स्प्रे टाकून हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता. पोलिसांनी ओपींना अटक केली आहे. 
 
तसेच अधिकारींनी सांगितले की, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह खून, शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तसेच मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी मिरचीचा स्प्रे सोबत आणल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना बाबा सिद्दीकी यांचावर स्प्रे फवारून त्यांची हत्या करायची होती. पण त्याआधीच आरोपी शिवाने गोळीबार केला. कारण स्प्रे आरोपी धर्मराज कश्यपकडे होता. जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

Edited By- Dhanashri Naik