1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (16:06 IST)

पावसात निवारा शोधणाऱ्या कुत्र्यास कोमात जाई पर्यंत मारहाण, दोघांना अटक

Both arrested
मुंबई येथे प्राणीमित्रांचा आणि नागरिकांचा संताप अनावर करणारी घटना घडली आहे. हा सव धक्कादायक प्रकार वरळी येथे घडला आहे. जोरदार पडत असलेल्पाया पावसात पावसापासून बचाव करण्यासाठी इमारतीच्या छताखाली गेलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी बेदम व अमानुष मारहाण केली. या प्यारकरणी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्सचे संस्थापक यांनी पुढकार घेत आवाज उठवत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, त्यानंतर वरळी पोलिसांनी दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक केली आहे. जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मात्र दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे सुखलाल वर्पे यांनी माहिती दिली.