Festival Posters
✕

LIVE: स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

Updated: सोमवार, 1 जून 2026 (21:56 IST)

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेबाबत एक मोठे आणि धक्कादायक अपडेट समोर आले आहे. योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत संपल्यानंतर, मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी समोर आले आहे. तपासानंतर, अंदाजे ८० लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांचे लाभ आता बंद करण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा

सोमवारी सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन अवजड वाहनांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. एका कंटेनर ट्रकची त्याच्या पुढे असलेल्या दुसऱ्या ट्रकशी आणि एका एर्टिगा कारशी टक्कर झाली. सविस्तर वाचा

बीडच्या मंजरसुंबा येथील मराठा आंदोलनातून परतणाऱ्या कार्यकर्त्यांना ट्रकने धडक दिली. रामचंद्र जामदादे यांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे. सविस्तर वाचा 

नागपूर विमानतळावरून मुंबई, बंगळूरु आणि हैदराबादला जाणारी विमानसेवा गेल्या दोन महिन्यांपासून प्रभावित झाली आहे. एअर इंडियाने १ जूनपासून विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा

अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी मुस्लिम आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विभागातील रिक्त पदे, उर्दू हाऊस आणि आमदार रईस शेख यांच्या १२ मागण्यांवर चर्चा होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा

लाडकी बहिण योजनेतून ८१ लाख महिलांची नावे वगळल्याने रोहित पवार यांचा संताप झाला त्यांनी या योजने बाबत एक दावा केला आहे. ते म्हणाले, ही योजना बंद करण्यासाठी केवायसी हे केवळ एक निमित्त आहे.आता ही योजना बंद होणार आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.  सविस्तर वाचा...
 

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना हवामान विभागाने काहीसा दिलासा दिला आहे. आजपासून राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवार, १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राजकीय नाट्याने भरलेला होता. महायुतीच्या जागावाटप सूत्रानुसार पुण्याची प्रतिष्ठित जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली होती.  सविस्तर वाचा...
 

 पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदारांवर झालेल्या हल्ल्यावरून उद्धव ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

पुणे अवैध दारू प्रकरणात आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, मृतांची संख्या २४ झाली आहे. भिवंडीतून ५,९२९ लिटर मेथॅनॉल जप्त करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदारांवर झालेल्या हल्ल्यावरून उद्धव ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा...
 

पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या इंधन दरांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे, जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात स्कूल बस आणि ऑटोच्या भाड्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि इंधनाच्या किमतींमध्ये होणारी सततची वाढ यांचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. 

मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धंनजय देशमुख यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. धंनजय देशमुख यांच्यावर समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  सविस्तर वाचा...
 

पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या इंधन दरांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे, जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात स्कूल बस आणि ऑटोच्या भाड्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि इंधनाच्या किमतींमध्ये होणारी सततची वाढ यांचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

पुणे अवैध दारू प्रकरणात आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, मृतांची संख्या २४ झाली आहे. भिवंडीतून ५,९२९ लिटर मेथॅनॉल जप्त करण्यात आले आहे.सविस्तर वाचा...
 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. त्यामुळे एक वाद निर्माण झाला असून विरोधक या योजनेवर राज्य सरकारवर ताशेरे ओढत आहे.  या योजने बाबत आदिती तटकरे यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. तसेच या योजने बाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या इंधन दरांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे, जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात स्कूल बस आणि ऑटोच्या भाड्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.सविस्तर वाचा...
 

पुण्यात उष्णतेचा ताण वाढत असून, ही परिस्थिती तापमापकावरील तापमानापेक्षाही अधिक धोकादायक आहे. आयआयएसईआर (IISER) आणि आयएमडी (IMD) च्या शास्त्रज्ञांनी डब्ल्यूबीजीटी (WBGT) पद्धतीचा वापर करून एका आरोग्य संकटाचा इशारा दिला आहे.सविस्तर वाचा...
 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. त्यामुळे एक वाद निर्माण झाला असून विरोधक या योजनेवर राज्य सरकारवर ताशेरे ओढत आहे.  या योजने बाबत आदिती तटकरे यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. तसेच या योजने बाबत स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर वाचा...
 

गेल्या ५ दिवसांपासून ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात फिरत असलेल्या एका जखमी आणि अशक्त नर बिबट्याला वन विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाने इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडले आहे.सविस्तर वाचा...

कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या घटक पक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकता दर्शवली आणि उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा दिल्या..सविस्तर वाचा...
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: फडणवीस यांनी १८,००० गावांमध्ये महत्त्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार ३.०' योजनेची घोषणा केली

Sant Namdev Maharaj Jayanti भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

सरपंच बनण्याची इच्छा, पण जागा महिलांसाठी राखीव...४२ वर्षीय ऑटो चालकाची आत्महत्या

मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील लाखो प्रवाशांना फायदा होणार; मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

पुढील लेख
Show comments