1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (16:23 IST)

साताऱ्यात घरगुती वादावरून 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा निर्घृण खून

baby legs
साताऱ्यातील कोडोली येथे घरगुती वादावरून 10 महिन्यांच्या चिमुकल्याला विहिरीत ढकलून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका काकाने आपल्या 10 महिन्याच्या पुतण्याचा केवळ घरगुती वादामुळे खून केला. अक्षय सोनावणे असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 10 महिन्याच्या शालमोल नावाच्या बाळाला दुकानातून चॉकलेट घेऊन देतो असं सांगून घेऊन गेला. बराच वेळ झाल्यावर तो बाळाला घेऊन आला नाही. तेव्हा बाळाची शोधाशोध केल्यावर त्याचा मृतदेह विहिरीत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपी काकाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.