बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (15:11 IST)

हृदयद्रावक ! राजस्थानमधील कोटा येथे घरगुती वादाला कंटाळून आईने पाच मुलींसह विहिरीत उडी घेतली

Heartbreaking! Fed up with a domestic dispute at Kota in Rajasthan
घरगुती वादाला कंटाळून  एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिने आपल्या पाच मुलींसह विहिरीत उडी घेतली. या महिलेचे पतीसोबत दररोज भांडण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याला कंटाळून महिलेने हे आत्महत्येचे पाऊल उचलले. ही घटना राजस्थानमधील कोटाची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालियाखेडी हे कोटामधील बंजारांचे गाव आहे. येथे राहणार्‍या शिवलालची पत्नी बदामी देवी हिचे शिवलालशी वारंवार भांडणे होत असत. याला कंटाळून बदामी देवीने जीव देण्याचे ठरवले. शिवलालच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी दुपारी 12 वाजता तो घराबाहेर गेला होता. सायंकाळ झाली तरी तो परतला नाही. रात्री त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. बदामी देवी यांनी विहिरीत उडी घेतली तेव्हा त्यांच्या 14 वर्षांची अंजली आणि 7 वर्षांची पूनम या दोन मुली घराबाहेर असण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोघींचे प्राण वाचले. 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात महिलेने घरगुती वादाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यानंतरच या घटनेमागचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.