बुलेट ट्रेन नागपुरातही येणार, हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले
Nagpur Winter Session News: देशातील पहिल्या हायस्पीड ट्रेन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, तसेच या मार्गानंतर आता नागपूर-मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचेही काम होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार देशातील पहिली हायस्पीड ट्रेन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ताशी 320 ते 350 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे 508 किमीचे अंतर अवघ्या 2 ते 2.30 तासांत पूर्ण करेल. तसेच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 12 बुलेट ट्रेन स्थानकांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. या मार्गानंतर नागपूर-मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचेही काम केले जाईल, ज्याचा अन्य 7 मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.