शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (23:51 IST)

बस अपघात ! पुण्यातील शाळेची बस रायगड दरीत कोसळली ,15 विद्यार्थी जखमी

accident
रायगड येथे माणगाव- रायगड रस्त्यावर घरोशी वाडी येथे शाळेच्या बसला अपघात होऊन बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेची बस शिक्षक-विद्यार्थी -पालकांसह रायगड सहलीसाठी आली असता माणगाव -रायगड रस्त्यावर घरोशी वाडी येथे परतीच्या प्रवासात अपघात होऊन बस दरीत कोसळली या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले आहे. किल्ले रायगडला पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीशाळेची बस सहली साठी आली आता या मिनी बसचा माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन बस खोल दरीत कोसळली सुदैवाने बस झाडात अडकली त्यामुळे मोठा अपघात टळला.

या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले त्यांच्यावर माणगावच्या रुग्णालयात उपचार सुरु असून दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Edited  By - Priya Dixit