संबंधित माहिती
- ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक खाजगी पर्यटक बस जळून खाक
- मुंबईत मुसळधार पावसा रेड अलर्ट जारी; सोसाट्याचे वारे आणि समुद्राच्या उंच लाटांचा इशारा
- संभाजीनगरमध्ये कंपनीची बस ट्रॅक्टरला धडकल्याने चालकाचा मृत्यू; २५ कर्मचारी जखमी
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- शनिवारी मुंबई आणि ठाण्यासह चार शहरांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी
नागपूरममध्ये 'आपली' बसची स्कुल व्हॅनला धडक; चार विद्यार्थिनी जखमी
नागपूरमधील पंचशील चौकात 'आपली' बसची शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला धडक बसली. चार विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या असून, एक मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शहरातील पंचशील चौकात एक मोठा अपघात थोडक्यात टळला. नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली' बसची शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला धडक बसली. या अपघातात व्हॅनमधील चार विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा अपघात सकाळी ७:१५ च्या सुमारास पंचशील सिनेमा हाऊसजवळ झाला. माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार दिल्यानंतर तात्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik