मात्र ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही : संभाजी राजे
भाजप नेत्या आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जो तो उठतो मराठा आरक्षणावर बोलतो,मात्र ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही असे म्हटलं होते.प्रीतम मुंडे यांच्या वक्तव्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ओबीसी समाजासोबती आमचं काम सुरु आहे.ओबीसीचे नेते भेटले होते असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच १२७ व्या घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेत पारित करण्यात आले असून या विधेयकाचेही संभाजीराजे यांनी स्वागत केलं आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी संभाजीराजेंना प्रीतम मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.मराठा आरक्षणाबाबत प्रीतम मुंडे यांचं वक्तव्य विरोधात्मक आहे. त्यांचे वक्तव्य १२७ व्या घटनादुरुस्तीशी संबंधित नाही.ओबीसी, मराठा आणि इतर जाती एकाच छताखाली राहतात.केंद्र सरकारने जसं इडब्लूएस दिलं आहे तसेच तुम्हाला ही करता येईल.मात्र दंगल करणं हा काही मार्ग नाही असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेतो ते काम माझं सुरु राहील. ओबीसी समाजासोबत आमचं काम सुरुच आहे. ओबीसी समाजाचे नेतेमंडळी भेटले असून ओबीसी आरक्षणावर कधी लक्ष देणार असेही त्यांनी म्हटलं आहे. परंतू आम्ही सर्व एकच आहोत अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.