गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (15:46 IST)

परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही : संजय राऊत

sanjay raut
शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आम्ही शिवसेनेचा उमेदवार जाहीर करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे राऊत म्हणाले होते. संभाजीराजेंना विरोध नाही परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन जागा लढवणं हा राजकीय अपराध नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे. मराठी माणुस आणि हिंदुत्वाचे फार मोठी संघटना आहे. शिवसेना राजकारणात अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा वेळेला जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका ६ जागांसाठी होत आहेत. त्यातील २ जागा शिवसेना लढत आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि निवडून आणू अशी शिवसनेची भूमिका असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.
==============