शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (14:36 IST)

ज्योतिबाच्या चरणी 1 टन वजनी महाघंटा अर्पण

दक्खनच्या राजा ज्योतिबाच्या चरणी 1 टन वजनाची महाघंटा सांगलीच्या एका भक्तांकडून अर्पण करण्यात येणार आहे. ही  महाघन्टा पंचधातूने बनलेली हे. ही  महाघंटा पावणे चार फूट उंच 40  इंच रुंद वजन 1 टन आहे.ही  या महाघंट्याचा आवाज पंचधातूने बनविल्यामुळे दूर पर्यंत जाणार. पंचधातूची महाघण्टा सांगलीच्या एका भाविकाने ज्योतिबाच्या चरणी अर्पण केली आहे. सर्जेराव नलवडे असे या भक्ताचे नाव असून ते दर रविवारी कोल्हापूरला येऊन ज्योतिबाचे दर्शन घेतात. या पूर्वी त्यांनी 2000  साली ज्योतिबाला घंटा अर्पण केली होती. ज्याला आता तडे गेले. त्यामुळे त्यांनी देवाला नवी घंटा द्यावी आणि ही  घंटा पंचधातूची असावी असा विचार केला. आणि पलूस इथल्या मेटल फाउंड्रीमध्ये ही घंटा तयार करण्याचं काम सुरु झालं. ही  महाघंटा तयार करण्याचं काम आता शेवटच्या टप्प्यात असून ही महाघंटा 27 मे रोजी सकाळी जोतिबा डोंगरावरील देवबावी तलावाच्या पश्चिमी बाजूस बसविण्यात येणार आहे.