शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (09:53 IST)

पेनूरजवळ भीषण अपघात डॉक्टर दांपत्यासह 6 ठार! 4 जखमी

6 killed in horrific accident near Penur 4 injured पेनूरजवळ भीषण अपघात डॉक्टर दांपत्यासह 6 ठार! 4 जखमी
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पेनूर गावाजवळ युनोव्हा व कारचा अपघातात डॉक्टर पती पत्नी सह एकूण सहा जण ठार झाल्याची घटना घडली आहे. 
मोहोळचे रहिवासी डॉक्टर खान आपल्या कुटुंबीयांसह स्वतःच्या वाहनाने बाहेरगावी गेले होते. रविवारी ते परत येत असताना पेनूरजवळ माळी पाटीजवळ पंढरपूर कडे जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीशी जोरदार धडक झाली. या अपघातात कार मधील डॉ. अफरीन  खान , मुजाहिद ईमाम आतार, अरमान मुजाहीद आतार,ईरफान नुरखॉ खान त्यांची पत्नी बेनझीर ईरफान खान, मुलगी अनाया ईरफान खान यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना सोलापुरात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.