मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (16:17 IST)

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

भरधाव कार फूटपाथवर चढून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात काल रात्री (शुक्रवार ६ डिसेंबर) हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी कारचालक मद्याच्या अंमलाखाली असल्याचा आरोप आहे.
 
चुनाभट्टी परिसरात काल रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमाराला हा अपघात झाला. काल रात्री दोन तरुणीबाहेर निघाल्या असता त्यांची मैत्रिण अर्चना ही देखील कंटाळा आला म्हणून सहज त्यांच्यासोबत बाहेर निघाली होती. ती दोघींच्या काहिशी पुढे चालत होते.
 
काही कळण्याच्या आत मागून भरधाव वेगात कार आली आणि अर्चनाला धडक दिली आणि कार तशीच पुढे निघून गेली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की अर्चनाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी कारचालकाने मद्यप्राशन केल्याचा दावा केला जात आहे.
 
दरम्यान, चुनाभट्टी पोलिस चौकीला पार्ठे कुटुंबाने घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत वाहन चालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृत्यू अर्चना पार्टेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि चुनाभट्टीतील रहिवाशांनी नकार दिला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती असून चुनाभट्टी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.