शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2016 (17:27 IST)

भुजबळ यांची रवानगी जेल मध्ये करा - ई डी

chagan bhujbal
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. ईडीच्या विशेष कोर्टाने भुजबळांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.एकीकडे मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळला तर दुसरीकडं ईडीच्या विशेष कोर्टाने छगन भुजबळांची  हॉस्पिटलमधून जेलमध्ये करण्याचे आदेश दिले आहे . कोर्टाच्या या आदेशामुळे भुजबळांचा हॉस्पिटलमधील मुक्काम संपला आहेत. तर   भुजबळांवर अँजिओग्राफी करण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांचा सल्ला घेण्यात यावा. याबाबत निर्णय झाल्यानंतरच त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावे अशा सूचनादेखील संबंधित कोर्टाने दिल्या आहेत.त्यामुळे आता भुजबळ पुन्हा जेल मध्ये जाणार हे उघड झाले आहे.