बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:55 IST)

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना  मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पंकज भुजबळ यांची त्यांच्याशी भेट झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी पंकज भुजबळ यांना सांगितले की ,भुजबळ समर्थक जोडो अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अन्याय पे चर्चा कार्यक्रमाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानत आहे. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की,कार्यकर्त्यांनी भावनाप्रधान न होता संयम बाळगावा आणि सहानुभूतीपोटी चालविलेल्या राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी थांबवाव्या. आपला न्यायालयीन प्रक्रियेवर आणि माननिय न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. न्यायालयाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी भावनिक न होता संयम बाळगावा आणि आपले सामाजिक कार्य अखंड सुरु ठेवावे अशा सुचना त्यांनी पंकज भुजबळ यांना केल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आ.पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.