1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Chalisgaon A policeman was killed in a cricket dispute

चाळीसगाव : क्रिकेटच्या वादातून पोलिस कर्मचाऱ्याचा खून

murder
चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. मयत तरुण मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे समजते. चाळीसगाव पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा, पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी सायंकाळी शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
 
दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून क्रिकेट स्पर्धेतील वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor
पुढील लेख
Budget 2024 अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसाठी मोठी घोषणा होऊ शकते