शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (08:58 IST)

चाळीसगावला पं.प्रदीप मिश्रा यांचे १६ जानेवारीपासून महाशिवपुराण कथा

देशात व देशाबाहेरही आपल्या मधुर रसाळ वाणीतून शिवपुराण कथेच्या माध्यमातून तमाम भाविकांना अध्यात्माची विलक्षण आनंद देणारे आंतरराष्ट्रीय कथाकार प.पू. पं.प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचा कार्यक्रम चाळीसगाव येथील मालेगाव रोड स्थित सुमारे ४० एकर परिसरात येत्या १६ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत आयोजित केल्याची माहिती खा.उन्मेश पाटील यांनी दिली.
 
कथेच्या कार्यक्रमस्थळी खा.उन्मेश पाटील विविध पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्त्यांसह पाहणी केली. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती महाशिवपुराण कथेला लाभणार आहे. खा.उन्मेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पाहणी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाययोजनांची चर्चा केली.
 
खा.उन्मेश पाटील म्हणाले की, पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणार आहे. चाळीसगाव परिसरातील मालेगाव, धुळे, पारोळा, एरंडोल, भडगाव, पाचोरा, नांदगाव बनोटी, सोयगाव, कन्नड या परिसरातून लाखो भाविक येणार आहेत. महाशिवपुराण कथेचे निरूपण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या माध्यमातून भाविकांना श्रवण करता येणार असल्याने अधिकाधिक भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे .
 
याप्रसंगी नायब तहसीलदार जितू धनराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, आशुतोष खैरनार, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, पालिकेचे वीज अभियंता महाले, पंढरीनाथ पवार, ज्येष्ठ नगरसेवक राजु चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, देविदास चौधरी, उद्योजक संजय पवार, उद्योजक पद्माकर पाटील, तुषार भावसार, प्रशांत वाघ, सौरव पाटील, सारंग जाधव, अमित सुराणा, चेतन वाघ, भाऊसाहेब पाटील, रवीभाऊ चौधरी, मयूर साळुंखे, बंटी चौधरी, किशोर गुंजाळ, सचिन राठोड, पप्पू राजपूत, बाळासाहेब शिनकर, कल्पेश मालपुरे, साहेबराव काळे, सागर गुंजाळ, नरेन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.