मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (08:49 IST)

मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर ! पुन्हा इंधन टंचाईची शक्यता

हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांत तीव्र भावना असून, नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
 
मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही.त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. तर सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधना टँकर भरून बाहेर पडला नाही. त्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुडवडा होण्याची शक्यता झाली आहे.
 
देशात नवीन वाहन कायदा येणार आहे. या कायद्यातील तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी एक जानेवारी रोजी संप पुकारला होतो. दोन दिवस हा संप सुरु होता. त्यानंतर दोन जानेवारी रोजी मनमाड येथे जिल्हाधिकारींनी बैठक घेतली होती. त्यानंतर तोडगा निघाल्यावर एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून टँकर रवाना झाले होते. परंतु आता दहा जानेवारीपासून पुन्हा संप सुरु झाला आहे.
 
अनेक चालक आज टँकर भरण्यासाठी आले नाही. दरम्यान या संपाची कुठल्याही वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली नाही. प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.