रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (20:36 IST)

चाळीसगाव : तरूणींचे अश्लिल चाळे;आमदार चव्हाणांनी केली कॅफेची तोडफोड, चालकाला घेतले ताब्यात

arrest
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कॅफेत तरुण-तरुणींचा अनैतिक प्रकार सुरु होता. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यांनी चाळीसगाव पोलिसांसह कॅफेवर धाड टाकली. यावेळी त्यांना अत्यंत धक्कादायक प्रकार आढळुन आला.हा प्रकार पाहून संताप अनावर झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केली. दरम्यान, कॅफे चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.
कॅफे मालकाने तरुण आणि तरुणींना अनैतिक कृत्यासाठी जागा दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी पोलिसांसह केलेल्या छापेमारीत तरुण-तरुणी गैरकृत्य करताना आढळून आल्याचे समोर आले. गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत कॅफेमध्ये तरुण-तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदर मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी पोलिसांच्या पथकासह आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कॅफेबाबत मी मागील वर्षीदेखील कॅफे चालकाला समज दिली होती. त्यानंतर काही काळासाठी या ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार बंद झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पुन्हा अनैतिक प्रकार सुरू झाल्याची माहीती सामोर आल्याने नगर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मी या ठिकाणी आलो. यावेळी या ठिकाणी गैरकृत्य करताना तरुण-तरुणी आढळून आले

आहेत, असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले. अशा प्रकारची गैरकृत्य कोणी करत असेल आणि त्याला कोणी जागा उपलब्ध करून देणार असेल तर ते कदापिही खपून घेतले जाणार नाही. वेळ पडली तर अशा इमारतींवर बुलडोझर देखील फिरविला जाईल, असा इशारा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor