शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (08:59 IST)

पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता

भारतीय हवामान शास्त्र विभागच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने जारी केलेल्या भारतीय हवामान वृत्तानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह देशाच्या विविध भागात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
गुजरात आणि ओडिशा किनारपट्टीवर काही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर 28 ते 30 एप्रिल दरम्यान दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
 
29 आणि 30 एप्रिलला विदर्भासह देशाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे .