1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (15:38 IST)

Fact Check: महिलांनी पीरियड्स दरम्यान COVID वॅक्सीन घेऊ नये? जाणून घ्या सत्य

COVID-19 vaccine before and after five days of their periods
केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. 28 एप्रिलपासून वॅक्सीनेशनसाठी कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु अॅप यावर रजिस्ट्रेशन सुरु होत आहे. परंतू सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे की ज्यात मुलींना काही ठराविक दिवस लसीकरण करु नये असा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या काय आहे व्हायरल पोस्ट-
 
व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं जात आहे की महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस आधी आणि 5 दिवस नंतर वॅक्सीन घेऊ नये. दावा आहे की पीरियड्स दरम्यान महिलांची इम्यूनिटी कमकुवत होते. तसंच वॅक्सीन लावल्यानंतरही इम्युनियक्ष कमी होते काही दिवसांनंतर प्रतिकारक शक्ती वाढते. अशात पीरियड्स दरम्यान वॅक्सीनेशन केल्याने धोका वाढू शकतो.
 
काय आहे सत्य- 
‘वेबदुनिया’ ने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हेमा जाजू यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी म्हटलं की ‘ही समज चुकीची आहे, असे काहीही नाही. मुली आणि महिला कधीही लस घेऊ शकतात. मासिक पाळी आणि लसीकरण यांच्यात काहीही संबंध नाही.’
 
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुषमा खंडेलवाल यांनी सांगितले की,’पीरियड्स दरम्यान लस लावण्यात कोणतीही अडचण नाही. ज्यांना अशक्तपणा जाणवतो, उलट्या होतात किंवा क्रॅम्प्स येतात त्यांनी टाळावा. ज्यांना पीरियड्स दरम्यान काही त्रास होत नाही त्यांनी लस घेण्यात हरकत नाही.’
 
भारत सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या फॅक्ट चेक टीमने देखील या फेक मेसेजवर लोकांना सावध केलं आहे. PIB ने ट्विट करत सांगितले की ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेक पोस्टमध्ये दावा केला जात आहे की महिलांनी आपल्या पीरियड्सच्या 5 दिवसापूर्वी आणि 5 दिवसानंतर वॅक्सीन घेऊ नये.’