बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (17:10 IST)

अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही : चंद्रकांत पाटील

chandrakant patil

कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यावर बंदी घालण्याची भाषा करणाऱ्या मंत्री रोशन बेग यांना महाराष्ट्र- कर्नाटक समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी ठणकावलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”कर्नाटकाला महाराष्ट्र पाणी, वीज आणि आरोग्याच्या सुविधा ही पुरवतं. त्यामुळे बेग यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, वेळप्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊ, ” असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकला ठणकावलं आहे. अशा प्रकारचे इशारे देऊन कर्नाटक सरकार घटनेचं उल्लंघन करत आहे. याबाबत कर्नाटकला रितसर पत्र लिहून यावर जाब विचारु असं ते म्हणाले आहेत.