मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पत्नी प्रियकरासोबत गेली पळून, पतीने दोन मुलींना गळफास लावून स्वत: केली आत्महत्या

चंद्रपूरमध्ये एका महिलेने  प्रेमासाठी पतीसह लहान मुलांना सोडून गेली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून स्वत: आत्महत्या केली आहे. 
 
बल्लारपुर इथे रुषीकांत कदुपल्ली हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रुषीकांत कदुपल्ली शिक्षक असून त्यांची पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब होते. मात्र, रुषीकांत यांच्या पत्नीचे एका वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण 
असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत होते. एक दिवस त्यांची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे रुषीकांत यांना कळले. त्यामुळे रुषीकांत एकटे पडेल आणि त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला. या घटनेने व्यथीत झालेल्या रुषीकांतने आत्महत्येचे पाऊल उचलले.

आत्महत्या करण्यापूर्वी रुषीकांतने आपल्या दोन्ही मुलींना गळफास लावत त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.