शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:04 IST)

दिवाळीत भारनियमन नाही : ऊर्जामंत्री

राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र  मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे.