मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे.